नवी दिल्ली : इराण अमेरिका युद्धात एलपीजी गॅसची मोठी समस्या निर्माण झाली. बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनही स्थिती आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्चे तेल आणि एलपीजीची वाहतूक ठप्प आहे. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. त्यामध्येच आता काही नियमात बदल करण्यात आला.
ज्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे, अशा ग्राहकांना एलपीजी सिलिंडरवर अनुदान मिळणार नाही. याचा अर्थ असा आहे की, घरगुती सिलेंडर अधिक पैसे देऊन खरेदी करावे लागणार आहे. तेल कंपन्यांनी देशभरातील दहा लाख रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या ग्राहकांची माहिती संकलित केली आहे. याबाबत त्यांना मेसेजही पाठवला जाईल. एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यादरम्यान तेल कंपन्यांकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत.
याव्यतिरिक्त, मृत आणि बनावट खातेधारकांना ओळखले जात आहे. त्यांची चौकशी करून त्यांचे कनेक्शन्स कायमस्वरूपी बंद केली जात आहेत. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी अनुदानात पारदर्शकता आणण्यासाठी ही मोहिम सुरू केली. उच्च उत्पन्न गट आणि मृत ग्राहकांच्या एलपीजी गॅस जोडण्यांची चौकशी सुरू केली आहे. यामुळे फक्त पात्र आणि या नियमात बसणार्या ग्राहकांनाच अनुदान मिळणार आहे.